हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख शहेनाज यांना नुकताच राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैन नागरी लिपी परिषद दिल्ली तथा श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती इंदोर तर्फे 2023- 24 चा दिला जाणारा हिंदी साहित्य आणि नागरी लिपी ची सेवा हेतू साहित्यरत्न अलंकारण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे

हा सन्मान प्रसिद्ध साहित्यकार सरोज कुमार डॉ. नर्मदा प्रसाद उपाध्ये डॉ. पुरणमल सहगल व नागरी लिपी परिषदेचे अध्यक्ष डॉ.हरीश सिंह पाल व मध्य भारत हिंदी साहित्य समितीचे प्रधान मंत्री श्री हरे राम वाजपेयीजी महासचिव डॉ. प्रभू चौधरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तरी त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. केंद्रीय ग्रामीण राज्यमंत्री आदरणीय सूर्यकांताताई पाटील, सचिव श्री अरुण कुलकर्णी सर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉॅ. उज्वला सदावर्ते मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे