मूर्तिजापूर – शहर पोलिसांनी कसाबपुऱ्यात ‘सर्जीकल स्ट्राईक’ सदृश्य कारवाईत गोवंशाचे १९० किलो मांस जप्त केले व ५ जणांना ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या या शहरातील पहिल्याच कारवाईत अवैध कत्तलखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची शहरात चर्चा आहेमूर्तिजापूर शहर पोलिसांनी ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या उण्या-पुऱ्या पाऊण महिन्याच्या कारकिर्दीत अवैध गोवंश वाहून नेणाऱ्यांवर आठ वेळा कारवाई करून शेकडो गोवंशांचे प्राण वाचविले आहेत. आपल्या हद्दीतील या प्रकाराच्या मुळावरच घाव घालावा, या विचारात असणारे ठाणेदार भाऊराव घुगे यांना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता गोवंशाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. लगेच तीन अधिकारी, महिला पोलिसांसह १७ जणांचा ताफा सोबत घेतला. सुक्ष्म नियोजन केले.परीणामांचा अदमास घेऊन पंच, शेतकरी, छायाचित्रकारास सोबत घेऊन ६ वाजता कसाबपुऱ्यात धाव घेतली.कसाबपुऱ्यातील कमील्यात गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी पाठविलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सर्व साहित्य विनाविलंब घटनास्थळावरून हलविण्यात आले. ३८ हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीचे १९० किलो मांस, ८०० रुपये किंमतीच्या दोन कुऱ्हाडी व तीन चाकू असे ३८ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त केले. #0 सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!