नांंदेड दि.१७: नांदेड जिल्ह्याची पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, व अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार नांदेड यांचे आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना अर्जुन मुंडे, पोकों चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजेद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी दिनांक १६ जुलै रोजी ४ :४५ वाजताच्या सुमारास कामठेकर यांचे घराजवळ कौठा नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकुन आरोपी नामे अमन किशोर जोगदंड वय २० वर्षे व्यवसाय बेकार रा. खोब्रागडे नगर गल्ली क्र. २ नांदेड आकाश गजानन गणगोपलवार वय २३ वर्षे व्यवसाय बेकार रा. पुष्प नगर पावडेवाडी नाका नांदेड कपिल हिरामण सदावर्ते वय २७ वर्षे व्यवसाय ऑटो चालक रा. चेअरमन पाटी पुर्णा रोड नांदेड यांना ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले एक गावठी पिस्टल, एक खंजर व सोन्याचे दागिने, एक मोटार सायकल जप्त केले आहेत. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक ६१७/२०२४ कलम ३/२५, ४/२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि श्री महेश कोरे करीत आहेत. सदर आरोपींतांनी मागिल एक महिन्यापुर्वी रवि नगर कौठा नांदेड व वसमत जि. हिंगोली येथे चैन स्नॅचिंग केले व साठे
चौक येथे मोटार सायकल चोरी केले असल्याची सांगितले आहे. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण व वसमत शहर जि. हिंगोली अभिलेखावर माहिती काढले असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन ४८७/ २०२४ कलम ३९२,३४ भादवि, पोलीस स्टेशन वसमत शहर जि. हिंगोली गुरन ३९३ /२०२४ कलम ३९२,३४ भादवि व पोलीस स्टेशन शिवाजी नगर गुरन २८७/२०२४ कलम ३०३ (2) भा.न्या.स. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर कार्यवाही बाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा, नांदेड यांचे कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
