👉🏻अभिनेता विनय देशमुख यांचे 33 कोटी गोमय गणेश मूर्तीचे उदिष्टे…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मुंबई यांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण व रक्षण करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील पाटील चित्रपटाचे सुप्रसिद्ध अभिनेता विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांनी 33 कोटी ” गोमय गणेश मूर्ती ” व इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे उदिष्ठे उराशी बाळगून त्यांनी मुंबई मंत्रालय येथे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते या प्रदर्शनाला महाराष्ट्राचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरि झिरवळकर सह मंत्रालयातील असंख्य प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या प्रदर्शन स्टॉल ला भेटी देऊन भरघोस असा प्रतिसाद दिला त्यामुळे हिमायतनगरच्या सरसंमचे नाव मंत्रालयात गाजले…
या बाबत सविस्तर वृत्त असे की प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण दिवसेंन वाढत चालले असून येणाऱ्या काळात पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्रामध्ये प्लास्टिक साठू लागले असल्याने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उदिष्ठे उरांशी बाळगणारे पाटील चित्रपटाचे सुप्रसिद्ध अभिनेता विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांनी पी.ओ.पीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्ती विसर्जनानंतर अनेक वर्ष विरघळत नसल्याने व त्यावरील रासायनिक रंगामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन जलस्त्रोताला व जलीय पर्यावरणाला धोका ठरत असल्याने पीओपी मूर्तीला पर्याय म्हणून शाडूच्या गणेश मूर्तीचा पर्याय समोर आणला होता मात्र शाडूच्या मूर्ती विसर्जनानंतरही त्या विहिरीत मातीचा गाळ साचून अनेक दिवस शासनाला धोका होत आहे त्यामुळे पीओपी व शाडूच्या मूर्तीलाही अजून एक पर्याय म्हणून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीच्या निर्मितीचा नवा टप्पा म्हणजे ” गोमय गणेश मूर्ती ” म्हणून सर्व महाराष्ट्रा समोर आणली आहे या गोमय गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती एका तासात पाण्यात विरघळते विरघळलेल्या मूर्तीचे कण मासे व जलचरांसाठी खाद्य बनते हे खाद्य वनस्पतीसाठी खत म्हणून उपयोगात येते या मध्ये बिया टाकल्या तर खत मिळून नवीन रोप तयार होते म्हणून गाईच्या शेणापासून या मूर्ती तयार करण्याचे काम हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. जिल्हा नांदेड येथे मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्रात 33 कोटी गोमय गणेश मूर्ती बनवण्याचे उद्दिष्ट उराशी बाळगणारे सुप्रसिद्ध अभिनेता विनय प्रताप देशमुख सरसमकर यांनी गणेश विसर्जनानंतर काही तासात विरघळणारी गोमय गणेश मूर्तीचे अवशेष जलीय प्राण्यासाठी ते खाद्य बनत आहे त्यामुळे यांच्या गोमय गणेश मूर्तीला जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे याचा एक छोटा प्रयोग म्हणून त्यांनी नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मुंबई मंत्रालय येथे त्यांच्या गोमय गणेश मूर्तीचा भव्य स्टॉल मंत्रालयात उभारला आहे त्या स्टॉलला महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांसह मुंबई येथील बड्या व्यापारी व नागरिकांनी भेटी देऊन भरभरून असा प्रतिसाद दिला व येणाऱ्या काळात या गोमय मूर्तीचे घराघरात सर्वांनी प्राणप्रतिष्ठापना करण्याचे आव्हान महाराष्ट्राचे माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरि झिरवळकर यांनी केले आहे…