• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 9, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
29 May 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1783743501 1685356629739
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड (प्रतिनिधी) दि. 27 :- राज्यातील सर्वसामान्य जनतेला, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांसह महानगरातील जनतेला हे सरकार आपले सरकार वाटत आहे. वृद्ध महिलांसह निराधार व्यक्तीही विश्वासाने आमच्याशी संवाद साधू इच्छित आहेत. आपले म्हणून बोलत आहेत. ही विश्वासर्हता संपादन करण्यासाठी दिवसाची रात्र करून महाराष्ट्र शासनाने विविध विकास कामांना जी गती दिली आहे त्याचे हे आदर्श मापदंड आम्ही समजतो. ज्या कष्टावर, साधेपणावर व लोककल्याणकारी भूमिकेतून हा विश्वास आम्ही मिळवला तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही जपू अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यातील तळणी-साप्ती-कोहळी-शिरड-पेवा-करोडी-उंचेगाव-भानेगाव-हदगाव रस्ता व पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. भानेगाव येथे कयाधू नदीच्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफकत आमना, आनंदराव जाधव, बाबुराव कदम कोहळीकर, उमेश मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मतदारसंघातील सर्वच घटकांचा विकास व्हावा यासाठी खासदार हेमंत पाटील ज्या पद्धतीने आग्रह धरतात व विकास कामे मंजूर करून आणतात त्याला तोड नाही. वेळप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांसाठी ही कामे महत्वाची आहेत, असे सांगून त्यांनी आमच्याशी भांडणही करायचे सोडले नाही, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना त्यांनी मंजूर मिळवून घेतली. केवळ मंजूरीच नव्हे तर यासाठी आर्थिक तरतूद करून घेतली. यामुळे 10 हजार 610 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल. यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला अंदाजित 1600 कोटी रुपये खर्च होणार असून प्रति वर्षी 500 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. या भागात हळद उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना अधिकचे उत्पन्न मिळावे यादृष्टिने खासदार हेमंत पाटील यांच्या आग्रहावरून वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांची मान्यता व केंद्र शासनाने दिले आहे.

हिंगोली, नांदेड जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा व पाण्याची उपलब्धता इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगली आहे. यामुळे ज्यांच्याजवळ पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी ऊसाच्या पिकाकडे वळले आहेत. ऊसाच्या शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे साखर कारखानदार यांच्या मर्जीवर असल्याने अनेकवेळा शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनातून लाभ होईल, असे सांगता येत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पोफाळी साखर कारखानाच्या पूर्नजीवनाचा आग्रह त्यांनी धरला. अवघ्या दोन महिन्यात हा कारखाना सूरू करून इथल्या शेतकऱ्यांनाही सर्वांपेक्षा अधिक भाव दिला याचे आम्हाला कौतूक आहे. सर्वांगिन विकासाची दूरदृष्टी खासदार हेमंत पाटील यांनी जपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झुकते माप दिल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

*शासन आपल्या दारी हा सुशासनाचा आदर्श*
महानगरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला अधिक लोकाभिमूख करून शासन आपल्या दारी हा अभियानाची जोड दिली आहे. हा उपक्रम प्रशासनातील सर्व घटक व शासनाच्या विविध विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांना पात्र असलेले नागरिक यांच्यामध्ये सवर्णमध्य साधणारा आदर्शमापदंड असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. शासनासमवेत या अभिनव योजनेसाठी प्रत्येक गावातील पाच शिवदूत यांनी पुढे येऊन या उपक्रमाला अधिकाधिक लोकाभिमूख करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

*वृद्ध महिलेची मागणी समजून घेण्यासाठी
जेंव्हा खासदार डॉ. शिंदे व्यासपीठावरून उतरतात*
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हदगाव तालुक्यातील विविध कामांच्या भूमिपूजन समारंभात आपल्या भाषणापूर्वी उपस्थित असलेल्या महिलांपैकी अंजनाबाई विणकरे या वृद्ध महिलेशी व्यासपीठावरून खाली उतरून संवाद साधला. अंजनाबाईने घरकुलाची मागणी करताच त्याला होकार देत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. अंजनाबाईनेही धीटपणे खासदार डॉ. शिंदे यांना नाव व फोन नंबर मागितल्यावर खासदार डॉ. शिंदे यांनी तिला जवळ घेत आश्वस्त केले.

*सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती*
– खासदार हेमंत पाटील
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा ही एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र मेहनत करून यशस्वीपणे सांभाळली आहे. सर्वसामान्याच्या कुणबी कुटुंबातील एक व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो हे त्यांनी घेतलेल्या अहोरात्र कष्टाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दु:ख आणि त्यांच्यावर येणार प्रसंग याची जाणिव त्यांना आहे. या जाणिवेतूनच विविध शासकीय योजनांना त्यांनी लोकाभिमुखतेची जोड देऊन ग्रामीण भागातील सिंचन, रस्ते, वाहतुकीची सुविधा यावर भर दिल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य वर्ग हा शेतीशी निगडीत आहे. या दोन्ही जिल्ह्यात नद्यांची संख्या व ठराविक वर्षानंतर होणारी अतिवृष्टी यामुळे अनेक गावे संपर्कापासून वंचित राहतात. आज ज्या कामाचे भूमिपूजन झाले तो या कयाधू नदीवरील पूल आता उभा झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या गावांचा सुमारे 20 कि.मी. चा फेरा आता वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

Next Post

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

Related Posts

image editor output image212473427 1751989605948
Top News

प्रस्तावित विज दरवाढ थांबवा मागणीसाठी सोलार विक्रेता असोशिएन धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

8 July 2025
210
image editor output image56608599 1751989268014
Top News

किरण बंडे यांनी केले मेतके बंधूंसाठी रेनकोट वाटप

8 July 2025
211
image editor output image211549906 1751989134267
Top News

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘अनुभूती’ राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन, महिलांच्या आर्थिक समावेशनातील भूमिकेवर भर

8 July 2025
210
image editor output image706037208 1751773868778
Top News

श्री संत नामदेव शिंपी गृहनिर्माण सहकार संस्था,धर्माबाद येथे वृक्षारोपन करुन जागतिक सहकार दिन साजरा

6 July 2025
277
image editor output image 200633318 1751719827269
Top News

नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनिमी काव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करनार : राहुल साळवे, चंपतराव डाकोरे

5 July 2025
219
image editor output image 201556839 1751719657645
Top News

श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव २०२५   आयोजक  श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड

5 July 2025
247
Next Post
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

image editor output image1864765617 1685364034956

जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, भुजबळांनी टोचले नेत्यांचे कान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image212473427 1751989605948

    प्रस्तावित विज दरवाढ थांबवा मागणीसाठी सोलार विक्रेता असोशिएन धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

    8 July 2025
    image editor output image56608599 1751989268014

    किरण बंडे यांनी केले मेतके बंधूंसाठी रेनकोट वाटप

    8 July 2025
    image editor output image211549906 1751989134267

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘अनुभूती’ राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन, महिलांच्या आर्थिक समावेशनातील भूमिकेवर भर

    8 July 2025
    image editor output image706037208 1751773868778

    श्री संत नामदेव शिंपी गृहनिर्माण सहकार संस्था,धर्माबाद येथे वृक्षारोपन करुन जागतिक सहकार दिन साजरा

    6 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image212473427 1751989605948

    प्रस्तावित विज दरवाढ थांबवा मागणीसाठी सोलार विक्रेता असोशिएन धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

    8 July 2025
    image editor output image56608599 1751989268014

    किरण बंडे यांनी केले मेतके बंधूंसाठी रेनकोट वाटप

    8 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज