हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील उच्चशिक्षित सरपंच श्री प्रल्हाद भाऊराव पाटील हे सर्वप्रथम 1995 साली टेंभुर्णी गावचे सरपंच झाले आणि त्यांचे सिविल इंजीनियरिंग चे ज्ञान गावच्या विकासासाठी त्यांनी वापरले त्यांनी गावातील सांड पाण्यावर प्रभावी उपाय योजना म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून टेंभुर्णी हे गाव हागणदारी मुक्त बरोबर गटार मुक्त सुद्धा केले त्यामुळे त्यांना सन २००६ साली राष्ट्रपती कै. ए पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते तसेच टेंभुर्णी गावात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानास जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार मिळाले तसेच त्यांच्या कार्यात ची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री धीरज कुमार यांनी टेंभुर्णी गावास भेट देऊन त्यांच्या कार्याची पाहणी करून टेंभूर्णी हे गाव आदर्श असल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने व इतर गावांना मार्गदर्शक ठरेल असा सुतोवात सुद्धा त्यांनी काढला होता
त्यानंतर सन 2014 साली जिल्हा परिषद नांदेड ने हा उपक्रम संबंध जिल्हाभर राबविण्याचे ठरविले आणि गावोगावी हे शोषखड्डे होऊ लागले होते तसेच या कामाला महाराष्ट्र सरकारने नांदेड पॅटर्न नाव देऊन नरेगा योजनेतून दोन हजार रुपये देण्याची योजना आखली आणि हा नांदेड पॅटर्न महाराष्ट्रभर तर पसरलात पण शेजारील राज्य तेलंगणा, आंध्रप्रदेश पाठोपाठ हरियाणा या तीन राज्यात सुद्धा प्रसिद्ध झाला यामुळे अनेक गावातील घाणीचे साम्राज्य नष्ट होऊन डासांची उत्पत्ती थांबली गाव डास मुक्त पॅटर्न सुद्धा बनले त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावून गाव स्वच्छ आणि सुंदर झाले त्याचबरोबर जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन नाली दुर्गंधी पासून गावकऱ्यांची सुटका झाली तसेच आदर्श सरपंच ठरलेले प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर हे सन 1995 ते 2000 या कार्यकाळात सरपंच होते सन 2000 ते 2005 मध्ये त्यांच्या पत्नी सरपंच राहिल्या त्यानंतर च्या काळात ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले सध्या त्यांच्या पत्नी यशोबाई प्रल्हाद पाटील ह्या गावच्या सरपंच आहेत आजही टेंभुर्णी गावात भूमिगत शोष खड्डे, डिजिटल शाळा, आय.एस.ओ. नामांकन प्राथमिक शाळा ,गावाला फिल्टर च्या पाण्याची व्यवस्था, घरोघरी नळ,उत्तम आरोग्य , सह गावात 2000 वृक्ष लागवड करून गावचा भौतिक विकासासोबत आर्थिक शारीरिक बौद्धिक विकास साधत टेंभुर्णी हे गाव हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव बनविले त्यामुळे त्यांच्या या कार्यास तालुक्यासह जिल्हा परिचित आहे