नांदेड दि. १९: २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत संभाजीनगर बोड नांदेड केंद्रातून ज्ञान भारती विद्यामंदिर या संस्थेच्या बुध्दाची गोष्ट या नाटकाला प्रथम पारितोषिक व शकुंतला स्कुल फॉर एक्सलंस या संस्थेच्या बडाळा ब्रिज या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच परिवर्तन प्रतिष्ठान, बीड या संस्थेच्या झाले मोकळे आकाश या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनो आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे संभाजीनगर नांदेड बीड केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन प्रथम पारितोषिक राहूल जोंधळे (नाटक- बुध्दाची गोष्ट), द्वितीय पारितोषिक महेश घुंगरे (नाटक-बडाळा ब्रिज), तृतीय पारितोषिक गंगाधर भांगे (नाटक- सत्यम वचनम्), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक नारायण त्यारे (नाटक-झाले मोकळे आकाश), द्वितीय पारितोषिक माणिकचंद थोरात (नाटक- बुध्दाची गोष्ट), नेपथ्य: प्रथम पारितोषिक उध्दव बडे (नाटक झाले मोकळे आकश), द्वितीय पारितोषिक गजेश्वरी देलमाडे (नाटक-मिसिंग), रंगभूषा प्रथम पारितोषिक क्षितिज कुलकर्णी (नाटक-वदा यदा ही धर्मस्य), द्वितीय पारितोषिक राधा पवार (नाटक- बुध्दाची गोष्ट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्वराज कराळे (नाटक- वडाळा ब्रिज), व पूनम ढाकणे (नाटक- चिऊताई चिऊताई दार उघड), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे कौमुदी रुईकर (नाटक-सायोनारा), अक्षरा डोंगरगावकर (नाटक-वडाळा ब्रिज), सिध्दी भालेराव (नाटक- सत्यंवचनमं), सुप्रिया भोसले (नाटक-मिसिग), आराध्या पांचाळ (नाटक- बुध्दाची गोष्ट), सर्वेश कान्हेकर (नाटक- चिऊताई चिऊताई दार उघड), साई निकम (नाटक- सत्यम वचनम्), नमन जादोत (नाटक-करामती पोरं), प्रथमेश गित्ते (नाटक- बुध्दाची गोष्ट), रोहित जगताप (नाटक- सत्यम वचनम्),
दि. ०७ जानेवारी, २०२४ ते १५ जानेवारी, २०२४ या कालावधीत तापडिया नाट्य मंदिर-संभाजीनगर, कुसुम नाट्यगृह-नांदेड, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकृष्ण ३४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. शंकर घोरपडे, श्री. भरत जगताप आणि श्रीमती स्वातो वेदक यांनी काम पाहिले.सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड