यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद टिमचे सुयश : सिव्हीटीएस सर्जन डॉ.विशाल खंते
नांदेड दि.२जुलै : नांदेड जिल्हयातील देळुब ता. अर्धापूर येथील रुग्ण पांडुरंग खराटे यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे हृदयावरील यशस्वी बेंटॉल शस्त्रक्रिया सिव्हीटीएस सर्जन डॉ. विशाल खंते यांनी यशस्वीरित्या पूर्ण करत रुग्णास जिवनदान दिले
याविषयी सविस्तर वृत्त असे की नांदेड येथील प्रसिद्ध व ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अवधूत मोरे यांनी निदान करून पांडुरंग खराटे यांना यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे संदर्भित केले.
सदरील रुग्णांना दम लागणे व चक्कर येणे ही लक्षणे होती. त्यांचे इकोकॉर्पिओग्राफी आणि सिटीस्कॅन केले असता हृदयातील नस फुगलेली आढळून आली. जिचा कधी पण फुटण्याचा धोका असू शकतो अशावेळी रुग्णा चा अचानक मृत्यू येऊ शकतो यावरून रुग्ण पांडुरंग खराटे यांनी वेळ वाया न घालवता यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉक्टर विशाल खंते यांची भेट घेऊन लवकरात लवकर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
या शस्त्रक्रियेचे नाव बेंटॉल शस्त्रक्रिया आहे ही ह्दयासाठीची सर्वात मोठी शस्त्रक्रिया आहे यामध्ये पूर्ण एओर्टा म्हणजे शरीराला रक्तपुरवठा करणारी नस बदलण्यात येते आणि हार्ट मधला एक वॉल बदलण्यात आला. सदरील शस्त्रक्रियेसाठी एकूण दहा तास कालावधी लागला.
एओर्टा ही हृदयातून उगम पावणारी एक मोठी धमनी आहे यात बेंटल प्रक्रियेद्वारे महाधमनी दोष दुरुस्त करत महाधमनीचा मूळ बदलून कोरोनरी धमनी पुनरावृत्ती करून बेंटॉल शस्त्रक्रिया पार पाडली
यामुळे मुख्यतः हृदयातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते.
चौकट
डॉ.विशाल खंते हे तज्ञ सिव्हीटीएस सर्जन :
डॉ. विशाल खंते हे मूळचे नागपूर येथील असून त्यांचे एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण हे जीएमसी नागपूर तर, एम.एस. जीएमसी औरंगाबाद येथून तर पुढील क्षिक्षण एमसीएच हे जीबी पंत न्यू दिल्ली येथून झाले व त्यानंतर त्यांनी ह्दयरोग शस्त्रक्रियेतील फेलोशिप युनायटेट किंगडम येथून पूर्ण केली आहे ,ते हृदयातील सर्व प्रकारच्या जटिल शस्त्रक्रिया चे एक्सपर्ट असून ते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे मागील वर्षभरांपासून कार्यरत आहेत
चौकट
रुग्णांने मानले टिम यशोदाचे आभार :
ह्दयरोगग्रस्त रुग्ण पांडुरंग खराटे यांनी किरण बंडे यांनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल मनस्वी आभार मानले.
चौकट
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 किंवा किरण बंडे – 9154167997 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे