ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.४ जुलै : लालबहाद्दूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय धर्माबाद येथील भौतिकशास्त्र विभागात मागील 30 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करणारे आपल्या विषयात गुणवत्ता आणि प्राविण्य असलेले विद्यार्थी प्रिय टेक्नोसेवी,अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असणारे तंत्रज्ञान ज्ञान विज्ञान आणि संशोधन यांना एकत्र करून महाविद्यालयाच्या विकासासाठी नवीन प्रयोग करता येतील का? यासाठी ज्ञानाचे कण शोधणारे डॉ. दुर्गाप्रसाद रांदड यांची आज लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे नियुक्ती पत्र आज धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. कमलकिशोर काकानी, सहसचिव वर्णी नागभूषण, संस्थाचालक श्री.उमेश झंवर, श्री.नागनाथराव नोमूलवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कनसे, उप प्रचार्य डॉ. योगेश जोशी, मावळते उपप्राचार्य प्रा. अमृतराव वानखेडे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्यपदी डॉ दुर्गाप्रसाद रांदड यांना देण्यात आले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!