ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.६ जुलै : शहरातील सन ११९७२ साली स्थापित झालेली सर्वांत जूनी संस्था म्हणुन ओळख असलेली श्री संत नामदेव शिंपी गृहनिर्माण सहकारी संस्था, नामदेव नगर धर्माबाद येथे जागतिक सहकार दिना निमित्त दिनांक५5 जुलै २०२५ रोजी संस्थेच्या मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपन करण्यात आले. यात नारळ, अशोक वृक्ष, सप्तपर्णी वृक्ष, जांभळ, कडुलिंबाचे वृक्ष गुलमोहर वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच वृक्ष लावुन नव्हे तर त्यांचे संगोपन करण्याचे ही संकल्प येथील रहिवाशी यांनी घेतली आहे.
यावेळी संस्थेचे जेष्ठ सदस्य साईनाथ हंगिगेकर, संतोष आन्ना, अपंग विदयालयाचे मुख्याध्यापक धुंदे सर, प्रा. सतिश गर्दसवार, प्रा. राम शेवळीकर सर, रमेश लोसरे पाटील, रमेश चिंतावार बाळापुरकर, इंजिनीयर पांचाळ साहेब, संजय गटलावार, श्री संत नामदेव शिंपी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे संचालक सौ. मनिषाताई शिरपुरे, भोजन्ना बत्तुलवार, शुभम बांगडे, सतिश रेणगुंटवार, दैनिक. प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक पी.जी. कोटुरवार तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!