नांदेड दि.८ जुलै: यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी किरण बंडे यांनी श्री संत बाळूमामा पालखी क्रमांक 12 येथील मेंढी पालन सेवेकऱ्यांसाठी पावसापासून सुरक्षेसाठी 17 रेनकोट चे वाटप केले.
श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांचा कळप हा संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो सध्या पाणी पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पावसापासून संरक्षण व्हावं या हेतूने मेंढ्यांच्या सेवेकऱ्यांना श्री किरण बंडे यांनी सामाजिक भावनेतून ही मदत केली आहे
तसेच सध्या श्री संत बाळूमामा ची पालखी मुखेड तालुक्यातील शिकारा या गावी असून त्याबद्दल पालखीचे कारभारी श्री सुरनर यांनी नारळ व भंडारा देऊन त्यांचा सन्मान केला.
किरण बंडे यांची बाळूमामा वरील असलेली श्रद्धा पाहून त्यांनी केलेल्या मेतके बंधूंसाठी केलेल्या सेवेबद्दल सर्वच भाविकांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे..