धर्माबाद दि.१७ ऑगस्ट : आघाडी शासनाच्या मंत्री मंडळात मा.खा.अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार सांभाळला. यांच्या कारकिर्दित संपुर्ण जिल्हयातील रस्त्यांचा दर्जा सुधारला. प्रवाश्यांचा प्रवास सुखकर झाला. विशेषतः धर्माबाद तालुक्यातील जि.प्र.मा., राज्य मार्गांची दुर्दशा सांगण्यापलिकडे होती. सोबत जि.प.अंतर्गत रस्त्यांबाबत तर न बोलण्या पलीकडे होते.
मा.अशोकरावजींनी नांदेड, माळकौठा, बळेगाव, कारेगाव, बाभळी फाटा व धर्माबाद-नायगाव (ध), बाळापुर-बासर हा गोदावरी काठावरुन बासरला नांदेडला जोडणारा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा अद्यावत तंत्रज्ञानाने अे.डी.बी. बॅंकेच्या अर्थसहाय्याने बनवला. हा जि.प्र.मा. ९३ कंत्राटदारांनी वेळेच्या आत अत्यंत उत्कृष्ठ बनविला. या सी.सी.रोडवरुनप्रवास करतांना, शेतकरी, व्यापारी, शालेय विद्यार्थी, दुधवाले, फुलवाले, रुग्ण, वृध्द प्रवासी सुखावले.
आवश्यक ठिकाणी तिव्र वळणावर पोलादी कठडे, रोड सिग्नल पाट्या, दर्शक पाट्या व प्रवाश्यांसाठी अद्यावत निवारे, सौर उर्जेवरील दिवे, गावाच्या नावांच्या पाट्या उभरल्या त्यामुळे प्रवासी आनंदले.
पण बळेगाव, राहेर, बाभळी, सिरजखोड व बेल्लुर गोदावरी पुलावरील कठड्यांचे लोखंडी पाईप चोरणा-या टोळयांना अत्यानंद झाला. या टोळ्यांनी आपला मोर्चा प्रवासी निवा-यावरील लोखंडी व सिमेंटपत्रे चोरण्याकडे वळविला. सुरुवात रोषनगाव पाटी, चिकना पाटी, सायखेड फाटा खरे तर हा निवारा भर वस्तीत आहे. शिवाय चोळाखा व इतर निवा-यापर्यंत वळविला.
रोशनगाव-चिकना, चोळाखा ई. प्रवाश्यांना उन्हात, पावसात आसरा ठरणारा निवारा हिरावुन नेला. तरी सा.बां.खात्यांनी करारान्वये सदरील कंत्राटदाराकडुन लवकरात लवकर निवा-याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. तरी कार्यवाही अभियंता भोकर यांनी याकडे लक्ष द्यावे. अभियंता सा.बां.खाते धर्माबाद यांनी संबंधित पोलीस स्टेशनला लेखी कळवुन, खब-यांमार्फत माहिती काढुन अशा टोळ्यांचा बंदोबस्त करायला बाध्य करावे, अशी मागणी प्रवासी संघटना धर्माबाद तर्फे शंकरराव जाधव रोशनगांवकर यांनी केली आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!