तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासोबत करडखेड परिसरात केला पाहणी दौरा व शेतकऱ्यांशी साधला संवाद
नांदेड दि.१८: रात्रभर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे करडखेड परिसरासह संपूर्ण देगलूर तालुक्यातील खरीप पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. नदी नाल्या काठच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेले. या पार्श्वभूमीवर मा. तहसीलदार भरतजी सुर्यवंशी यांना शेतकरी नेते तथा जिल्हा प्रवक्ते- काँग्रेस पार्टी नांदेड यांनी याबाबत कळविल्यावर ते प्रत्यक्ष येत शेतकऱ्यांचे गार्हाणे ऐकून घेतले. यावेळी तहसीलदार सुर्यवंशी साहेब व पोलीस उपनिरीक्षक मारोतीजी मुंडे यांनी आमच्या सोबत येऊन कावळगाव, सांगवी (क.), करडखेड परिसरातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेता देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली.