नांदेड, दि.२०: गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून शासकीय सेवेत रुजू व्हावे हे शहीद सुधाकर शिंदे यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे, असे आवाहन असिस्टंट कमांडंट प्रविण नारंजे यांनी केले.
छत्तीगढ येथे नक्षली चकमकीत शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुखेड तालुक्यातील बामणी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, प्यारनबी सायमियाँ शेख, पोलीस निरीक्षक विजय प्रतापसिंह, वीरपत्नी सुधा सुधाकर शिंदे, माजी सैनिक अध्यक्ष लालबा पिल्लेवाड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना असिस्टंट कमांडंट प्रविण नारंजे म्हणाले की, देशाचे रक्षण करत असताना २०२१ मध्ये छत्तीगढ येथे नक्षली चकमकीत सुधाकर शिंदे यांना वीर मरण आले. शहीद सुधाकर शिंदे हे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत सैन्य दलात अधिकारी झाले होते. गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून अधिकारी व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. शहीद सुधाकर शिंदे यांचे हे स्वप्न विद्यार्थ्यांनी साकार करावे, असे आवाहन नारंजे यांनी केले. यावेळी गुरुजी फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सुधाकर घोडके, राजू पवार, योगेश पाचपुते, मुख्याध्यापक कुलकर्णी, अर्जुन भोसले, माधव पाटील, मनुसाब शेख, व्यंकटराव पाटील, गुरुनाथअप्पा भायकाटे, विनोद शिंदे, अनिल पारडे, दस्तगीर शेख, प्रा.संजय शिंदे, शिवराज शिंदे, रामराव कांबळे, गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष यशपाल भोसले उपाध्यक्ष सतीश इंगोले यांची उपस्थिती होती.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!