महालिंगेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन्न
नांदेड दि.२१: येथील मगनपुरा – नवा मोंढा भागातील महालिंगेश्वर महादेव मंदीर येथे श्रावणमासानिमित्ताने बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजू सोनी पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी , स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक प्रतिनिधी भालचंद्र पवळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते विशाल शुक्ला, प्रशांत अंकरला ,स.जसपालसिंघ कोल्हापुरे,बैजू सोनी, सौ.सदिच्छा सोनी -पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मगनपुरा , वसंतनगर, विनायकनगर, विष्णुनगर,बाबा नगर आनंद नगर दयानंद नगर, नवा मोंढा , खोब्रागडेनगर या भागासह शाहूनगर जवाहर नगर, हर्षनगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला
महालिंगेश्वर महादेव मंदिर येथील महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील आशिष मुदंडा,सागर नागठाणे, सौ.सुनिता इंगोले, सुकेशना गारोळे, रेखा सोनी, सोनिया ठाकुर, शिवराणीबाई ठाकूर, शक्ति ठाकुर,संतोष स्वामी,आनेराज क़कुर्ले,गोपाल भालेराव, किशोर बोंढारे,विशाल खदारे ,विक्रम चव्हाण, प्रशांत अंकरला ,अमोल हम्बर्डे, रवि गारोळे,वैजू सोनी, जसपालसिंघ कोल्हापुरे , नितीन इंगळे पाटील, संजय ठाकूर, साईनाथ स्वामी, संभाजी साखरे, महेश ठाकूर , गणेश साखरे, राज ठाकूर, साहील ठाकूर, उदय पाटील तिडके, भास्कर पाटील शिंदे, रामकरण भेंडे, प्रभाकर कुलकर्णी,बळीराम ढाणे, आकाश रेड्डी, मयुर ठाकूर,जसबीर बेदी,मंगेश शर्मा, भिमराव ढगे, गौतम ढगे,धम्मपाल जोंधळे,युवराज जोंधळे, आकाश व्हावळे, साई जाधव,अनिल शर्मा,रमेश पाटील वानखेडे,गजानन दाचावार,स्वप्निल महाजन, राजू चिद्रावार, दत्ता दमकोंडवार ,राजेश गोटमवाड सुदर्शन पांचाळ यांच्यासह परिसरातील नागरीकांनी श्रमदान करून परिश्रम घेतले.
सामाजिक उपक्रमांतून मिळाले समाधान.
श्रावण मासानिमित्ताने सिद्धीविनायक गणपती मंदीर व त्यानंतर महालिंगेश्वर महादेव मंदीर व हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने मगनपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदीर येथे आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मीक समाधान लाभले असून यानिमित्ताने परिसरातील हजारो रहीवाशांशी थेट भेटी-गाठीचा योग जुळून आला आहे त्यासोबतच या भागातील रहीवाशांशी अंत्यत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्याची भावना या प्रसंगी आयोजक सौ.सदिच्छा वैजू सोनी पाटील यांनी व्यक्त केली आहे