गंभीर रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे उपचार
नांदेड दि.२१: सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून नांदेड येथील ३५ वर्षीय युवक शेख मोहम्मद शकील यांची आतड्याला दुखापत, छिद्र पेरिटोनिटिस, बहु-अवयव निकामी संसर्गावर यशस्वीपणे उपचार करत त्यांना जिवनदान दिले यासंदर्भात बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी दिली
यावेळी माहीती देतांना त्यांनी सांगितले की, नांदेड येथील ३५ वर्षीय युवक शेख मोहम्मद शकील यांच्या आतड्यांना गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटल येथे ऑपरेशन करून प्राथमिक उपचार करण्यात आले तदनंतर त्यांची एंकदरीत परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना यशोदा हॉस्पिटल येथे धाडण्यात आले त्यावेळी त्यांचे किडणी फंक्शनिंग व्यवस्थित नव्हते तर क्रियेटीन ६ पेक्षा जास्त होते तसेच त्यांना डायलिसिस करावे लागत होते
इलियोस्टॉमीसह लॅप्रोटॉमी उपचार…
पण आतड्याला दुखापत झाल्यामुळे रुग्णाला छिद्र पेरिटिनिटिस आणि क्रिएटीन ६ होता तर किडणी फंक्शनिंग डॅमेज झाली होती त्यामुळे डायलिसिसची आवश्यकता होती म्हणून रुग्णाला यशोदा हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले तेव्हा तो व्हेंटिलेटरवर होता आणि त्याला बीपी सपोर्टिव्ह औषधांसह डायलिसिसची आवश्यकता होती.पण नंतर उपचारानंतर रुग्णात सुधारणा झाली….आता डायलिसिसची आवश्यकता नाही. व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे आणि डिकॅन्युलेट केले गेले आणि पुनर्वसनासाठी जनरल वार्डात हलवले गेले.अलीकडेच त्यांच्यावर इलियोस्टॉमी क्लोजर प्रक्रिया अनियमितपणे पार पाडली आहे व रुग्ण आता सर्वसामान्य जिवन जगत आहे
यावेळी रुग्ण शेख शकील यांनी डॉ.दुर्गेश साताळकर, डॉ.मधूसूधन जाजू, डॉ.प्रसाद बाबू व यशोदा हॉस्पिटलच्या टिमचे आभार मानले
चौकट :
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 किंवा किरण बंडे ९१५४१६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे