अहिल्यानगर दि.२३: श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील माजी सैनिक महेश भिवसेन झेंडे यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी सैनिक महेश झेंडे यांचा आरोप आहे की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांनी आरोपी मच्छिंद्र सुभाष झेंडे यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून महेश झेंडे व योगेश झेंडे याना खोट्या गुन्ह्यात अडकविले. दिनांक 7 जुलै 2025 रोजी दाखल झालेल्या एफ.आय.आर. मध्ये महेश भिवसेन झेंडे व त्यांच्या भाऊ योगेश भिवसेन झेंडे यांचे नाव हेतुपुरस्सर सामील करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणातील सीडीआर, एसडीआर, टॉवर लोकेशन, व्हॉट्सॲप कॉल व मेसेजेस तपासून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच एफ.आय.आर. मधून निर्दोष व्यक्तींची नावे वगळून खरी गुन्हेगारांची नावे निश्चित करावी, अशी त्यांची मागणी आहे.
सरकार पोर्टल व सरकारी मेलवर दिलेल्या तक्रारीकडे देखील योग्य चौकशी न करता केवळ पोलीस निरीक्षक भंडारी यांच्या सांगण्यावरून ती निकाली काढण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर अन्याय झाला असल्याचे माजी सैनिक महेश झेंडे यांनी सांगितले व पोलीस निरीक्षक भंडारी यांचे त्वरित निलंबन करून सखोल चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत ते उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.व प्रमुख मागणी खोट्या एफ.आय.आर. मधून त्यांचे व त्यांच्या भावाचे नाव त्वरित वगळावे. व आरोपी व पोलीस निरीक्षक यांच्यातील मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन व मेसेजेसची चौकशी करावी. तसेच सरकारी पोर्टल व मेलवर दिलेल्या तक्रारीची नव्याने व निष्पक्ष चौकशी व्हावी. व पोलीस निरीक्षक भंडारी यांचे निलंबन करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करावे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!