नांदेड दि.७ संष्टेबर: भारतीय पिढीगत शोषित संघटना, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित व भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वीकारकर्ते आई सुमनबाई भानुदास यादव व सुपुत्र डॉ. कैलास भानुदास यादव होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजी. लक्ष्मणराव लिंगापुरे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिलीप बनसोडे, मा. बालाजी एबितदार, मा. नामदेवराव ऐलवाड, मा. संभाजीराव धुलगंडे, मा. नंदकुमार कोस्बतवार, मा. विश्वनाथ कोलमकर, प्रो. डॉ. आर.डी. शिंदे तसेच इंजी. चंद्रप्रकाश गंगाधर उपस्थित होते.
नांदेड येथील हॉटेल विसवा, शिवाजीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातील ओबीसी समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या प्रबोधनासाठी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी जात तोडा – समाज जोडा, शैक्षणिक प्रगती हीच खरी सामाजिक उन्नती अशा घोषणांचा पुनरुच्चार करून समाजातील नव्या पिढीला शिक्षण, संघटन आणि एकतेचे महत्व पटवून दिले.
स्व. भानुदास यादव यांच्या कार्याची आठवण करून देताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे जीवनकार्य समाजाच्या सर्वांगीण विकासाला समर्पित असल्याचे अधोरेखित केले. विशेषत: त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आजची पिढी प्रेरणा घेऊन शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.