नांदेड दि.११ सष्टेबर: भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते क्षितिज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडी संयोजक तथा नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांचा वाढदिवस जंगमवाडी येथील शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालाजी सूर्यवंशी, मुकुंद धानोरकर, तुलजाराम बागडिया, साईप्रसाद महाजन, कामाजी सरोदे, शिवा लोट, दिनेश यादव, चिद्रावार, गाडीवान यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या हस्ते महापालिकेच्या शाळेतील प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संतोष गवळी, विलास देवके, शिवाजी पांचाळ, किरण भालेराव अरविंद गोधणे, प्रफुल कांबळे, पंकज खाडे, मनोज चिंचोलीकर, सोनू पुंडगे, सादिक शेख, बिकुल खंदारे, अनुराग बावस्कर, पवन जाधव, सुनील दूधमल, यशोदास निखाते माधव खंडागळे, लड्डू खंदारे, जय थोरात, अनिकेत नितळे, सौरभ कदम, संदेश सावतकर आदींनी परिश्रम घेतले.













