नांदेड दि.१९ संष्टेबर: येथील विद्यापीठात होणाऱ्या अनियमितता व विद्यार्थ्यांच्या गैरसोयी बाबत दिलेल्या विविध निवेदनावर कारवाई न करणाऱ्या प्रशासनाला जागा आणण्यासाठी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या व दीक्षांत समारंभावर जाहीर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सिनेट सदस्य डॉ.महेश मगर यांनी केलेाहे
विद्यापीठांमध्ये आयोजित दिनांक १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रम तथा दीक्षांत समारंभावर जाहीरपणे बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे निवेदन डॉक्टर महेश मगर यांनी प्रशासनास दिले आहे. यामागील भूमिका मांडताना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हिताची कामे होत नसून फक्त अनियमित व भ्रष्टाचार मनमानी कारभार होत आहेत.प्रशासनाने खालील मुद्द्यांवर आपली भूमिका पारदर्शक केलेली नाही व वारंवार निवेदन देऊन, पुराव्यासहित तक्रारी दिल्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत.
विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांमध्ये अभाव दिसून येतो, दोन दिवसाआधी आलेल्या पावसात गुडघाभर पाणी वस्तीगृहात साचलेले व अधिसभा बैठकीमध्ये आम्ही चर खोदला आता पाणी येणार नाही याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ चालू होती, परंतु प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले आहेत.
पीएचडी पेट परीक्षा यामध्ये खूप दिरंगाई झाली आहे. विद्यार्थ्यांना तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन पुकारायची वेळ आली आहे. विद्यापीठ प्रशासन निष्क्रियतेने काम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे कामे करण्यात विद्यापीठ प्रशासनास कोणतेही स्वारस्य नाही असे दिसून येते. विद्यापीठामध्ये मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांवर प्रक्रियेमध्ये अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याकरिता मा.राज्यपाल महोदयांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. चुकीच्या उत्तर पत्रिका छापल्या जातात, (विना नंबरच्या) त्यांच्या कागदाचा दर्जा निविदेप्रमाणे नाही,बिल बोगस पद्धतीने बदलण्यात आले आहेत.याबाबत पुरावा देऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासन म्हणते कोर्टात जा, आम्ही मा.राज्यपाल कार्यालयाला उत्तर देऊ, व त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा करार पद्धतीने घेण्याची तयारी चालू केली आहे.
विद्यापीठामध्ये काही प्राधिकरणात नियमबाह्य कामे व टेंडर मंजूर करण्यात येत आहेत. याबाबत विद्यापीठ प्रशासन कारवाई करीत नाहीत. प्रशासनाला जाब विचारल्यास तुम्ही कोर्टात जा असे उत्तर दिले जाते. चुकीचे व नियमबाह्य कामे करून कोर्टात जा म्हणणे याचाच अर्थ अनियमितता व भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे असे अनेक सदस्य महेश मगर यांनी केले आहेत
चौकट …
जॉब फेअर फक्त अनफेअर ..!
विद्यापीठात १३ सप्टेंबर रोजी जॉब फेअर झाला. त्यामध्ये दहावी नापास, दहावी, बारावी, आयटीआय ही शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी दोन ते तीन हजार जागा होत्या यामध्ये स्वच्छता व साफसफाई सेवा, आचारी,कुली,पॅकिंग करणारा, लोडिंग करणारा या पदासाठी कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आले. ही बाब कितपत योग्य आहे. कोणत्या पदासाठी सर्वोच्च पॅकेज मिळाले याची माहिती प्रसार माध्यमात देण्यात आली नाही. फक्त विद्यार्थ्यांना मनस्ताप करणे व पदवीधरांची हेंडसाळ करणे हाच या मागचा हेतू विद्यापीठ प्रशासनाचा होता.
ऍडव्होकेट डॉ.महेश आनंदराव मगर,
अधिसभा सदस्य.स्वारातीम विद्यापीठ , नांदेड