नांदेड दि.१९ संष्टेबर : प्रबुद्ध परिवाराच्या वतीने दिला जाणारा प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार क्षितिज जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रबुद्ध परिवारच्या वर्धापन दिनानिमित्त दि. २० सप्टेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भदंत शिलरत्न, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची उपस्थिती राहणार आहे.
क्षितिज जाधव हे एक सामाजिक कार्यकर्ते असून महापुरुषांच्या जयंती निमित्त ते विविध सामाजिक उपक्रम राबवितात. वृक्षारोपण, गरजूंना मदत, अन्नदान, कपडे वाटप,रेनकोट वाटप आदींसह असंख्य उपक्रम त्यांनी राबविले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रबुद्ध परिवाराच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रबुद्ध परिवारचे संपादक संजय खाडे यांनी दिली.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!