नांदेड दि.२० संष्टेबर: महाराष्ट्र शासनाकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनाद्वारे नव्या पिढीला साठी संधीची द्वारे उघडली आहेत. त्यातून नवीन प्रयोग, नवीन वाटचाली घडविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. उद्योजकतेला आणि करिअरला मूल्यांची आणि समाजसेवेची जोड द्या. तुमच्या प्रत्येक कृतीत प्रमाणिकपणा, जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची आस्था असावी, असा मूलमंत्र महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर संपन्न झालेल्या या समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते. त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती तथा आय.आय.टी., कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय गोविंद धांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ.पराग भालचंद्र, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, आज गुरुगोविंद सिंगजी यांच्या समाधी चरणी मराठवाडा सुजलाम, सुफलाम होऊ दे, येथे शिक्षणाचे प्रमाण वाढू, रोजगार वाढू दे अशी प्रार्थना केली. विद्यापीठांनी सध्या एनआयआरएफ मधील रँकिंग कडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी अवंतिका विद्यापीठ, उज्जैनचे कुलपती तथा आयआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आता आयुष्यभर शिकण्याच्या नवीन विद्यापीठात, प्रवेश करत आहात. या विद्यापीठात परीक्षा नाहीत, गुण नाहीत, प्रमाणपत्रे नाहीत, व्याख्याने नाहीत आणि प्रयोगशाळाही नाहीत. मात्र या विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी अनुभवातून शिकत असतो. खरे जग हे गतिशील प्रणाली आहे. ते सतत बदलत असते. कोविडनंतर या बदलांचा वेग अधिक वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत काही कौशल्य कालबाह्य होतात, तर काही नवीन कौशल्यांची निर्मिती होते आणि ह्याच कौशल्यांची मागणी असते. स्वतः नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता ही आजच्या जगातली खरी आवश्यकता आहे. या संदर्भात मला एकलव्याची कथा फार महत्त्वाची वाटते. त्यांनी धनुर्विद्या स्वतः शिकली आणि आत्मसात केली. गुरुदक्षिणा म्हणून त्याने आपला अंगठा अर्पण केला आणि त्यानंतर आपल्या पायांच्या साहाय्याने धनुर्विद्या अवगत केली. त्यामुळे आजच्या काळात आपल्याला अनेक असे एकलव्य घडवावेत लागतील. अशा व्यक्तीला आपण डिजिटल एकलव्य म्हणू शकतो.
यावेळी दीक्षान्त समारोहाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या वैशिष्ठेपूर्ण उपक्रमासह विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अहवाल सादर केला.
याप्रसंगी विद्यापीठातून विविध विषयामध्ये सर्वाधिक गुण घेणारे सयदा तयबा, सागर गोरगिळे, तनिषा चव्हाण, रत्नशील सोनकांबळे, प्रसाद बोडखे, जहीर काझी, नाजिया शेख, वैष्णवी साकोळे, गायत्री चव्हाण, अंजुम बानू, सना गाडीवान, पद्मश्री मुसळे, अवंतिका पवार, अकिब अहेमद, अंजली बिरादार, आरती रोडगे, ऐश्वर्या नादे, हुडा दुरानी, बलजींदरकौर कांचवाले, गोविंद टीथे, कोमल धुमार, मनदीप तुलसाणी, गीता गुणाळे, सरस्वती लंगुटे, जीगिशा देशपांडे, सिंधुताई पाटील, नेहा कुरील, प्रतिभा जाधव, ऐश्वर्या कुलकर्णी, व्यंकट पांचाळ, कल्पना गाजरे, सुषमा पाटील, संयुक्ता कोचुरे, गायत्री सोळंकी, काजल वाघमारे, दीपिका यादव, विजया कांबळे, प्रतिमा मजगे, कैलास आघाव आणि नरसिंग बुगडे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवराच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. ज्ञानदंडासह दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. तर राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाचे सांगता झाली. यावेळी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह प्राधिकरण, विविध समीतीचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!