नांदेड दि.२० संष्टेबर: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सहयोग सेवाभावी संस्थेच्या विष्णूपुरी, नांदेड येथील शैक्षणिक संकुलास भेट दिली. सदरील भेटीदरम्यान मंत्री महोदय यांनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम, संस्थेची वाटचाल या विषयी माहिती संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे यांच्याकडून जाणून घेतली व त्याविषयी समाधान व्यक्त केले. आदरणीय दादांनी भेटीदरम्यान संस्थेतील प्राचार्य व शिक्षकांशी हितगुज करत संवाद साधला. सदरील भेटी दरम्यान संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, डॉ. ईशान अग्रवाल, प्रा शिवानंद बारसे, डॉ. विजय नवघरे, डॉ. गजला खान, प्रा. सुनील हंबर्डे, प्रा. विक्रम ढोणे, प्रा. सुनील पांचाळ, विश्वनाथ स्वामी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.तसेच प्राचार्य डॉ दिपक बच्चेवार ,भाजपाचे सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड,माधव पाटील उच्चेकर,माणिकराव लोहगावे, प्रवीण साले,डॉ.सुनील धोंडगे,बालजीराव पांडागळे, शरद पवार पाटील,मनोज भंडारी, शंकर मनाळकर, आशुतोष धर्माधिकारी, धोंडू सावकार पालदेवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!