नांदेड दि.२२ संष्टेबर:विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्द अंगी बाळगून प्रयत्नात सातत्य ठेवावे, यश निश्चितच त्यांना मिळेल असे आवाहन असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.
सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपूरी नांदेड संचलीत इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कुल विष्णुपूरी नांदेड चा माजी विद्यार्थी मनदीपसिंग जितेंद्रसिंग शिलेदारची निवड भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी झाली त्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
‘पुढे बोलताना डॉ. संतुकराव हंबर्डे म्हणाले,प्रयत्नामध्ये सातत्य राखल्यास जीवनात नक्कीच यश मिळते तेंव्हा अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनती सोबत सातत्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मनदीपसिंग शिलेदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना मनदीपसिंग याने शाळेपासुन भारतीय सैन्यात अधिकारपदी जाण्याचे स्वप्न बाळगले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम घेतले व प्रसंगी अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावे लागले तरी खचुन न जाता सातत्याने प्रयत्न करत यश मिळविले असल्याचे सांगितले.
तोच धागा पकडुन डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना अपयशाला न घाबरता आपले आणि आपल्या पाल्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी अध्यापक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, शाळेचे प्राचार्य विक्रम ढोणे, पालक जितेंद्रसिंग शिलेदार, उपप्राचार्य रूपाली गुंडाळे, पर्यवेक्षक संतोष जाधव, नंदा शेळके यांच्यासह शिक्षक , कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला कत्ते यांनी केले
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!