नांदेड २ ऑक्टोबर-
भारतभर प्रसिद्ध असलेल्या सुमित म्युजिक कंपनी गाण्याचे सर्व हक्क विकत दिल्यानंतरही कराराचे उल्लंघन करत असून या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
गायक संजय लोंढे यांनी राज्यभरात गाजलेल्या ’शांताबाई ’ या गाण्याची निर्मिती केली होती. या गाण्याचे सर्व हक्क साऊंड ट्रॅक रेकॉर्ड अँड कॅसेट (सुमित )कंपनीला दिले असल्याने मराठवाड्यातील दिग्दर्शक संजय राठोड यांनी त्यांच्या ’ दि महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटासाठी तथा या चित्रपटात हे गाणे चित्रित करण्यासाठी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करून दि. १२ डिसेंबर २०१५ रोजी ’शांताबाई’ या गाण्याची पुनरचित्रण, प्रदर्शन रिमेक आदी सर्व हक्क जय जगदंबा प्रोडक्शन या नावाने विकत घेतले. तसा करारही करण्यात आला. परंतु ‘दि महाराष्ट्र फाईल‘ या चित्रपटातील हे गाणे सिनेमा इतिहासातील सर्वात महागडे गाणे म्हणून चित्रित झाले आहे. विशेष हे प्रसिद्ध अभेनेत्री सनी लिओनी, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रित झाले असून सनी लिओनी ही आधुनिक शांताबाई म्हणून थिरकनार आहे. त्यामुळे सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांची नियत बदलली असून त्यांनी दि.१२ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या कराराचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. ही बाब संजय राठोड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांना कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे.
दरम्यान सुमित कंपनीने करार करून त्याचे उल्लंघन केलेल्याचा हा प्रकार भारतीय चित्रपट क्षेत्रातील लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यातच मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येणार्या एखाद्या दिग्दर्शकाचे पदार्पणापूर्वीच खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असून सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्या विरोधात कराराचे उल्लंघन, फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!