नांदेड दि.४ ऑक्टोबर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘अविष्कार २०२६’ संशोधन स्पर्धेत इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. पल्लवी कांबळे व मिस हाजेरा खान या मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. शेख समीर — १ला क्रमांक, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यक (Medicine & Pharmacy), पदव्युत्तर गट, आदित्य मुदीराज — १ला क्रमांक, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यक (Medicine & Pharmacy), पदवी गट, प्राजक्ता सूर्यवंशी — १ला क्रमांक, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी (Commerce, Management & Law) पदवी गट, प्रीती कुरिल — २रा क्रमांक, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यक (Medicine & Pharmacy), पदवी गट, स्नेहा लांडगे — २रा क्रमांक, मानवशास्त्र, भाषा व ललित कला (Humanities, Languages & Fine Art), पदवी गट, तसेच सहभागी झालेले विद्यार्थी प्राजक्ता दीपक सूर्यवंशी, खान मुस्कान मोहम्मद अलीम. यश राजेश जांभुळकर, दिव्या दिगंबर बचाटे, प्रणिता चक्रधर पावटेकर, श्रद्धा रामदास भालेराव या सर्व विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करून महाविद्यालयाचे नाव गौरवले आहे.
या स्पर्धेत विजेते आणि निवड झालेले विद्यार्थी आता विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार २०२६’ स्पर्धेत भाग घेणार आहेत, जी डिसेंबर २०२५ मध्ये लातूर (महाराष्ट्र) येथे होणार आहे.
महाविद्यालयाचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि परिश्रमाचे कौतुक करून त्यांना विद्यापीठस्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी येथील सर्व अध्यापन व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा गौरव केला.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!