
तुषार कांबळे !हदगाव प्रतिनिधी!
हदगाव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ सोनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष कार्यालयापासून हजारोच्या कार्यकर्ते व महिला यांच्या उपस्थितीत वाजत गाजत येऊन सौ. कुमुद सुनील सोनुले (हदगावकर) यांनी आपला नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यावेळेस माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील भाऊ सोनुले उपस्थित होते. सौ. कुमुद सोनुले या बु. खासदार हरिहरराव सोनुले हदगाव नगर पालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष बु. अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांच्या घराण्याची सून आहेत. यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे शहरातील वार्ड, वार्डतील हजारो महिला व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.









