नांदेड दि. २८ डिसेंबर: नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार ही संघटना ताकदीने निवडणूक मैदानात उतरणार असल्याची माहिती नांदेड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवारचे जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी दिली.
ते म्हणाले की, पक्षश्रेष्ठी त्यांच्या पातळीवर योग्य त्या राजकीय घटकांसोबत युती करण्यास तयार असून, येत्या काळात नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एक मोठी व निर्णायक भूमिका घेणार आहे. पक्षश्रेष्ठी ज्या कोणासोबत युती करतील, त्या युतीमध्ये विद्यार्थी व युवकांचा सक्रिय सहभाग राहणार असून, तो सहभाग प्रभाग क्रमांक 10, 11, 18 आणि 2 या प्रभागांमध्ये स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, पारदर्शक प्रशासन आणि युवकांच्या हक्कांसाठी ही लढाई असून, शहरातील तरुणांमध्ये पक्षाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीत विद्यार्थी शक्ती निर्णायक ठरेल, असा विश्वास फैसल सिद्दीकी यांनी व्यक्त केले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!












