तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !

नांदेड सह बाहेरील जिल्ह्यातील भाविक भक्ताचे श्रधास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कवाना ता.हदगांव येथील श्री.संत नंदी महाराज यांच्या 105 व्या पुण्यतिथी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमासह भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.यात्रेनिमीत्य भजन लेझीम स्पर्धा संपन्न झाली.तर सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार व मित्र मंडळीच्या आयोजनातुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेने यात्रेचा समारोप झाला.स्पर्धेचे पहिले बक्षीस दरवर्षीप्रमाणे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडुन होते.उदघाटन प्रसंगी बोलताना त्यांनी आरोग्य हिच संपती असल्याचे सांगत सध्याची गरज लक्षात घेता तरुण वर्गातील व्यसनाधीनता चिंताजनक होत असून आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी खेळ आवश्यकच असल्याचे सांगीतले.
यावेळेस सस्थांन समिती सह माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर साखरे,माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव हाके, विलासराव मस्के पळसेकर, अनिल पवार करमोडीकर, पंजाब पाटील खैरगाव ,आनंदराव मस्के, बंडु महाराज,बाळासाहेब वाकोडे, हेरे साहेब,संरपच भिकाजी सुर्यवंशी , माजी सरपंच साहेबराव पाटोदे, नंदकुमार असोले, गंगाधर चेपुरवार, साहेबराव पाटोदे , रामराम मिराशे, दशरथ राठोड,शंकर सेटे,सुञ संचलन शादुलवार सर, नंदकुमार आसोले,भारत कपसे, मारोती चेपुरवार,प्रदिप राठोड,रंगराव प्रधान, शांत्वन प्रधान, दिपक सूर्यवंशी, कैलास आडे,मदन राठोड , डॉ महेंद्र प्रधान,सतिष महाराज,सतिष आगरमोरे,बाळु फुले, विलास महाराज, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी.पत्रकार बांधव उपस्थित होते.सुत्रसंचलन सादुलवार सर यांनी केले.तर आभार आयोजक संदीप पवार कवानकर यांनी केले.








