नांदेड : ऊस दर आणि ऊसाची पहिली उचल यांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच मागासलेला आहे. यावेळी दुष्काळी परिस्थिती व ऊसाची उपलब्धता लक्षात घेता साखर व ईतर पदार्थ याचे दर तुलनेनं चांगले आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मागील 12 वर्षातील उच्चांकी आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता साखर कारखानदारानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर देने अपेक्षीत आहे. महाराष्ट्रात ऊसाची कमी उपलब्धता व साखरेचे वाढलेले दर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या दरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. परंतू नफ्याचा वाढलेला हिस्सा शेतकऱ्यांना देण्यास कारखानदार तयार नाहीत. याचाच परिणाम म्हणून ऊस दरा साठी पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदार व शेतकरी हा संघर्ष शिंगेला पोहचलेला आहे. नादेड जिल्ह्यात ऊस दर व पहिला उचल यावरुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांन मध्ये प्रंचड असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे चालु गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला एक रक्कमी प्रतिटन 3300 रू उचल मीळावी, मागील तीन वर्षाचे आर.स. एफ. चे हिशोब विशेष लेखा परीक्षक नेमुण तपासण्यात यावे व निघालेले आर. स. एफ. चे पैसे तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आदा करण्यात यावी ,प्रत्येक साखर कारखान्याच्या वजन काट्याजवळ शेतकर्यांन साठी निर्धारीत केलेल्या ऊस दराचा
फलक व ऊसाचे वजन कोणत्याही बाहेरील खाजगी वजन काट्यावर वरून करुन आणता येईल अशा आशयाचे फलक लावण्यात यावे. #सत्यप्रभा न्युज #नांदेड
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













