नांदेड दि.१९ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट
विभागाच्या वतीने ‘दिग्दर्शन व रंगतंत्र’ या विषयावर दिनांक २२/०१/२०२४ आणि २३/०१/२०२४ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ललित कला केंद्र येथील प्रा. डॉ. दीपक गरुड उपस्थित राहणार आहेत. शिक्षणशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. महेश जोशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. डॉ. अशोक कदम जनसंपर्क अधिकारी, स्वा. रा.ती.म.विद्यापीठ यांची कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रंगभूमीवर दिग्दर्शक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नाटक रंगमंचावर सादर करत असताना तांत्रिक घटक
सुद्धा कलात्मक दालनात प्रवेश करत असतात. दिग्दर्शकाला नाटक दिग्दर्शित करत असताना दिग्दर्शना बरोबर तांत्रिकबाबीचाही विचार करावा लागतो या अनुषंगाने विद्यापीठातील नाट्य व चित्रपट विभागाच्या वतीने दोन दिवशी दिग्दर्शन व नाट्यतंत्र या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमुळे नवोदित विद्यार्थी व रंगकर्मी यांना दिग्दर्शक म्हणून पुढे येण्यासाठी निश्चितच लाभ होऊ शकतो. सर्जनशील दिग्दर्शकाच्या सर्जनशील कलाकृतीच्या बरोबरच त्याची दृष्टी नाटकाला रंगमंचावर घेऊन जात असताना तांत्रिक घटकांचा सर्जनशीलतेने विचार अत्यंत आवश्यक असतो. विद्यार्थ्यांना दिग्दर्शनामध्ये आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थी स्वतंत्र विचारधारेने स्वतंत्र कल्पनाशकतेने नाटकाच्या दिग्दर्शन क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी
सातत्याने प्रयत्न करावा आणि रंगभूमीच्या वर्तुळात नव्या दिग्दर्शकाची भर पडावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यान्न्च्या हस्ते गुणगौरव केला जाणार आहे.
या कार्यशाळेचे संयोजन नाट्य विभागाचे प्रा. कैलास पुपुलवाड ( नाट्य विभाग ) हे करत असून संयोजन
समिती डॉ अनुराधा जोशी, प्रा. राहुल गायकवाड प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत ,प्रा.प्रशांत बोम्पिलवार, प्रा. नामदेव बोम्पिलवार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी
प्रयत्नशील आहेत. या कार्यशाळेत आजी माजी विद्यार्थी व रंगकर्मीनी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे
आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी
आजी माजी विद्यार्थी व नवोदित रंगकर्मी आणि रंगतंत्रज्ञ यांच्यासाठी प्रवेश मोफत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९९२२६५२२०५, ७३५०३९८२७३
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













