नांदेड दि.२१: महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडुन प्राप्त झालेल्या दिशा-निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनातर्फ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन आज दिनांक २१.०१.२०२४ रोजी सकाळच्या सत्रामध्ये महानगरपालिकास्तरीय Master Trainer पर्यवेक्षकासह मनपा आयुक्त तथा नोडल अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त प्रशासन तथा सहाय्यक नोडल अधिकारी कारभारी दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व ६ क्षेत्रिय कार्यालयाचे नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी असे एकुण २५ अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सदरील कार्यशाळेत शासनाने नियुक्त केलेले गोखले इन्सिटीट्युट, पुणे या संस्थेडील Master Trainer मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणासाठी शहरी भागासाठी एकुण ५६ पर्यवेक्षक व ८४१ प्रगणक कर्मचाऱ्याची महानगरलिकेमार्फत नियुक्ती करण्यात आलेली असुन आज दिनांक २१.०१.२०२४ रोजी दुपारच्या सत्रात विविध गट निहाय २८ पर्यवेक्षक व ४२० प्रगणकांना Master Trainer मार्फत प्रशिक्षण देण्यात आले असुन उर्वरीत पर्यवेक्षक व प्रगणकांना उद्या दिनांक २२.०१.२०२४ रोजी गट निहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गोखले इन्सिटीट्युट, पुणे या संस्थेकडुन सर्वेक्षण कामकाजाचे साफ्टवेअर तयार करण्यात आले असुन राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती हँडहेल्ड डिव्हाईस व्दारे बहुपर्यायी स्वरुपात प्रगणक (Enumerator) यांनी भरावयाची आहे. नियुक्त प्रगणकांनी पर्यवेक्षकांचे सहकार्य प्राप्त करुन घेऊन सर्वेक्षण करावयाचे आहे. मराठा समाजाचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण तपासणीठीच्या सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर व विहीत कालावधीत म्हणजेच ०७ दिवसांत पूर्ण करावयाचे आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी मराठा समाज व खुला प्रगर्वातील प्रती कुटुंब सर्वेक्षणासाठी रु.१००/- मानधन देण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक प्रगणकास ०७ दिवसांच्या आत सर्वेक्षण करावयाचे असुन प्रत्येक १५ प्रकणकांसाठी ०१ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला असुन प्रगणकांनी व पर्यवेक्षकांनी आपल्या सर्व्हेच्या कामाचा अहवाल दैनंदिन स्वरुपात वार्ड स्तरावरील नोडल अधिकारी यांचे मार्फत महानगरपालिका कार्यालयास सादर करावयाचा आहे.

सदरील सर्व्हेक्षणाचे काम प्रत्यक्ष स्वरुपात दिनांक २३.०१.२०२४ ते ३१.०१.२०२४ या कालावधीत होणार असुन महानगरपालिका हद्दीअंतर्गत शहरातील सर्व नागरीकांनी सदर सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना व पर्यवेक्षकांना सहकार्य करुन सर्वेक्षण यशस्वी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड