“मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे पाणी पुरवठा विभागास आदेश”
नांदेड दि.५: महानगरपालिका हद्दीतील नागरीकांना आता दोन दिवस आड पाणी पुरवठा होणार असुन दिनांक ६ ऑगस्टअ रोजी पासुन या दोन दिवस आड पाणी पुरवठ्यास सुरुवात होणार आहे. गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी लघु प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेला असल्यामुळे सध्या धरणातुन अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे नांदेड शहरवासीयांना आता तीन दिवसा ऎवजी दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. आता नांदेड शहरवासीयांना संपुर्ण महानगरपालिका क्षेत्रात साखळी पध्दतीने दोन दिवस आड पाणी पुरवठा होणार असुन मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात एकुण ३६ जलकुंभावरुन दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आल्याचे यावेळी शहर अभियंता सुमंत पाटील व कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
