राठोड यांनी केले आ.कल्याणकरांच्या प्रचारासाठी जीवाचे रान : डोअर टू डोअर प्रचार करत घेतल्या हजारो मतदारांना गाठीभेटी
नांदेड दि.१५ गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकारने केलेल्या सर्वांगीण विकासामुळे शहरी व ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणून उर्वरित विकास करण्यासाठी नांदेड उत्तरमधून आ. बालाजीराव कल्याणकर यांना प्रचंड मताने विजयी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ व निष्ठावान शिवसैनिक मुन्ना राठोड यांनी केले.
आ. बालाजीराव कल्याणकर यांचे खंदे समर्थक ओळखले जाणारे शिवसैनिक मुन्ना राठोड यांच्यावर आ. कल्याणकरांनी प्रचाराची धुरा सोपविलेल्या विद्युतनगर, शाहूनगर, बाबानगर, जवाहरनगर,नाईकनगर, आनंदनगर यासह आजूबाजूच्या परिसरात प्रचाराच्या दोन फेरी पूर्ण करत मुन्ना राठौर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे
मतदार भेटीवेळी मुन्ना राठोड व त्यांचे कार्यकर्ते हे मतदारांना हिंदुत्ववादी विचारसरणी अंगिकारून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक राजकारणाचा वसा जपत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाच्या यशो शिखरावर कशा प्रकारे नेले आहे. शेतकरी सन्मान योजना राबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये अनुदान देतांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महाराष्ट्रातील करोडो बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा समतोल साधतांना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने मोठी पायाभरणी करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने केले आहे हे पटवून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे
त्यासोबतच या सरकारमधील एक यशस्वी आमदार म्हणून बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची असंख्य कामे खेचून आणली आहेत. कृषी महाविद्यालय, वाडी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालय, असदुल्लाबाद येथील इनामी जमिनीचा प्रश्न, रस्ते विकास, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे हद्दीतील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते विकास यासह अनेक महत्त्वपूर्ण कामे आमदार कल्याणकर यांच्या काळात झाली आहेत.
गेल्या ६५ वर्षातील विकासाचा अनुशेष अवघ्या अडीच वर्षात भरून कायाची किमया आ. कल्याणकर यांनी साधली असल्याने आगामी काळात महाराष्ट्रातील आदर्श विधानसभा मतदारसंघ म्हणून नांदेड उत्तरची नोंद करण्यासाठी पुन्हा एकदा आ. बालाजीराव कल्याणकर यांना विजयी करायचे आहे.
त्यासाठी येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या निवडणूक निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा आणि महायुती सरकारमध्ये आपल्या हक्काचा मंत्री म्हणून त्यांना नांदेडच्या पालकमंत्री पदाची धुरा मिळण्यासाठी पाठबळ द्या, शेवटी असे विनम्र आवाहन मुन्ना राठोड यांनी प्रचारादरम्यान मतदारांना केले आहे.