विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि८ : शेतकर्याला पाठीमागून धडक दिल्याने डोक्याला मार लागून शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना हसूल परिसरात घडली. ही घटना सावंगी-हसूल रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ घडली. शेतकरी सावंगीकडून हसूलकडे निघाले असता एका पांढर्या रंगाच्या गाडीने धडक देवून सदर गाडीचालक घटनास्थळावरून पसार झाला.
चदांसिंग धन्नासिंग गिल (वय 45 वर्षे धंदा शेती रा. कोलठाणवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी चदांसिंग धन्नासिंग गिल हे रोडच्या कडेला रिक्षाची वाट बघत असताना यातील अज्ञात चार चाकी वाहन पांढ-या रंगाची जिचा क्र. MH 14 KQ 3808 चालकाने भरधाव निष्काळजीपणाने गाडी चालवून फिर्यादी गिल यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात फिर्यादी गिल हे गंभीर जखमी होवून त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघाताची खबर न देताच गाडीचालक पसार झाला.
याप्रकरणी जखमी चदांसिंग धन्नासिंग गिल (वय 45 वर्षे धंदा शेती रा. कोलठणवाड़ी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी क्रमांक MH 14 KQ 3808 च्या चालकावर हसूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पोलिस करीत आहे
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर