तुषार कांबळे : (हदगाव प्रतिनिधी) | हदगाव तालुक्यातील सात एप्रिल सोमवार रोजी मौजे उंचाडा येथे गावकऱ्यांतर्फे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख श्री विवेक देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.खा. सुभाषराव वानखेडे साहेब ,तसेच हदगाव हिमायतनगर चे लाडके आमदार लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर
यांची उपस्थिती होती.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवानंद मीना गिरे (सहआयुक्त समाज कल्याण नांदेड.)
श्री संजय तूबाकले (प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड. )
श्री कांबळे साहेब (उपजिल्हाधिकारी)
श्री आर के वंगाटे (संशोधन अधिकारी जिल्हा जात पडताळणी कार्यालय नांदेड).
सौ सुरेखा नांदे मैडम
(तहसीलदार हदगाव)
श्री डॉ अंकुश देवसरकर (भगवती हॉस्पिटल नांदेड)
श्री बाळासाहेब कदम (माजी सभापती)
श्री अनिल पाटील (माजी जि प सदस्य)
श्री आनंद भंडारे (सामाजिक कार्यकर्ते)
संदेश पाटील हडसणीकर (युवासेना जिल्हा प्रमुख)
श्री तातेराव वाकोडे (भाजपा तालुकाध्यक्ष हदगाव)
श्री तुकाराम चव्हाण (माजी सभापती)
श्री बाबुराव कदम (माजी उपसभापती)
श्री सुदर्शन पाटील मनूलेकर (वाईस चेअरमन निवघि बा.)
श्री पि.के.कदम हडफकर (सामाजिक कार्यकर्ते )
श्री संभाराव लांडगे (मा.जि प सदस्य)
अक्षय पवार(युवासेना तालुका प्रमुख)
संजय निर्मल, गजु पतंगे,बाबुराव काळे,वसंतराव निर्मल, गजानन आनंतवार, शिवाजी अनेराव, दत्ता अनेराव, धरमुरे आप्पा, विशाल कदम,श्रीराम पाटील,साहेबराव नेवरीकर इत्यादी मंडळी उपस्थित होती.
या वेळी उंचाडा येथील छ.शिवाजी महाराज पुळत्याच्या जागेत सभामंडप कामासाठी 20 लक्ष रुपये निधी मंजूर करून दिले त्याबद्दल आमदार साहेबांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच उंचाडा ते शेवाळा पांदण रस्त्याचे व पाहुण्या मारुती मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भास्कर देशमुख यांनी गावातील विकास कामाच्या संदर्भात गावकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या मंजूर करण्यासाठी विनंती केली.
अध्यक्षीय भाषणात विवेक देशमुख यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. मा आमदार बाबुरावजी कदम यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. शिक्षण,आरोग्य व सिंचन या गोष्टीवर आपण भर देत काम करणार आहोत असे सांगितले. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू असून सुद्धा शिवसैनिक,युवा वर्ग व महिला मंडळी यांची उपस्थित होती. बालाजीराव चव्हाण यांच्या शेता मध्ये सर्व पाहुणे यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
##सत्यप्रभा न्यूज नांदेड##
