

हिमायतनगर प्रतिनिधी/-हिमायतनगर शहरा सह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरात मागील 1 वर्षा पासून दिवसाढवळ्या चाकू हल्ले होत आहेत, भररस्त्यावर सर्रासपणे गुन्हेगार गुन्हा करतात आणि पसार होतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे त्यामुळे नांदेड परिक्षेत्रात नव्याने रुजू झालेले नवीन पोलीस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी .)शहाजी उमाप यांनी तरी आता हिमायतनगर शहरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीला व अवैध धंद्यांना जरब बसवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज गुडेट्टवार , शेख. दाऊद शेख.गफार,शेख.मुसा शेख. मायुब,अजीम खान या सह आदी जणांनी हिमायतनगर पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार देऊन शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा अशी विनंती केली अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असे सुद्धा त्या निवेदनात सांगितले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या शहराला 60 ते 65 गावे व दोन राज्याच्या सीमा लागून आहेत त्यामुळे हिमायतनगर शहर हे जिल्ह्यात 1 नंबरचे अवैध धंद्याचे केंद्र म्हणून चर्चेत येत आहे तालुक्यातील मौजे खडकी,पोटा सरसम या परिसरात हिमायतनगर पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात मटका अड्डे सुरू आहेत तर मागील अनेक दिवसांपासून हिमायतनगर शहरात गो-तस्करी ,गुटखा ,मटका सह मोठ्या प्रमाणात गॅंगवॉर , सहज चाकू हल्ले व मोटार सायकल चोऱ्यां झाल्यामुळे येथील पोलीस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत या सर्व बाबीकडे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी या घटने कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथील पोलीस निरीक्षकास विशेष अधिकार देऊन शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे तात्काळ बंद करून शहर शांतता मय करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शहरातील सुजाण नागरिकां सह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक शरद जराड यांच्या बदलीनंतर नांदेड येथून नव्याने हिमायतनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणारे अमोल भगत यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्वीकारला आहे पण या पदभारानंतर त्यांच्यासमोर हिमायतनगर शहरातील गुन्हेगारींना आळा घालण्याचे मोठे आव्हान समोर आहे अमोल भगत त्यांच्या पोलिसी अंदाज मध्ये हिमायतनगर शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे बंद करतील की पुन्हा त्यांना खतपाणी घालतील हे पहाने मात्र औसुक्त्याचे ठरणार आहे..त्यामुळे हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज गुडेट्टवार , शेख. दाऊद शेख.गफार,शेख.मुसा शेख. मायुब,अजीम खान सह आदी जणांनी हिमायतनगर पोलिसांना शहरा सह तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासंदर्भात एक लेखी निवेदन देऊन मागणी केली हे धंदे कायमचे बंद न झाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करू असे सुद्धा त्यांनी या निवेदनात सांगितले….
चौकट
⬛हिमायतनगर शहरा सह तालुक्यातील पोटा,खडकी परिसरातील मटका, जुगार अड्डे बंद करा अन्यथा आंदोलन करू :- मनोज गुडेटवार
हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका, गुटखा व अवैध देशी दारू असे अवैध धंदे सुरू आहेत याकडे स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे नूतन पोलीस निरीक्षकांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा एका लेखी तक्रारी द्वारे मनोज गुड्डेटवार यांनी हिमायतनगर पोलीस प्रशासनास दिला आहे…
⬛नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडून जात आहे :-सामान्य नागरिक..
हिमायतनगर शहरात दोन महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येत असतात कॉलेज परिसरात टवाळखोर मुलांकडून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव वेगात चालवणाऱ्या गाड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे ह्याची तक्रार पोलिसांना केली तरीही पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त या परिसरात लावत नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना गुन्हा करण्याचे बळ हिमायतनगर पोलिसांकडून मिळत आहे की काय ? त्यामुळे शहरातील सुजाण नागरिकांना पोलिसांवर विश्वासच राहिला नाही अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे…..