सत्यप्रभा न्यूज नेटवर्क
नांदेड दि.२: येथील उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बालाजीराव कल्याणकर यांची नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भक्ती लॉन्स मंगल कार्यालय येथे त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, , शहर प्रमुख मनोज ठाकूर,संतोष मादनवाड, मुन्ना राठौर कुरेश यादव, राजू गुंडावार, शहर प्रमुख उमेश दिघे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
आ..बालाजी कल्याणकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले आणि नांदेडमध्ये विजयाचा उत्सव सुरू झाला असून .शहरालगतच्या तरोड्यामधील अतिशय सामान्य कुटुंबातील देविदासराव कल्याणकर आणि सौ.सुभद्राबाई कल्याणकर या दोघांच्या पुत्राने अशी कामगिरी केली आहे की आई-वडीलांनाही आपले जीवन सार्थक झाले असे वाटत असेल.त्यांच्या विजयाने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झालाय,सामान्यातल्या सामान्य माणसालाही मीच आमदार झालोय असे वाटते.लोक म्हणताय! बालाजीराव फोन उचलतात, बालाजीराव लगेच भेटतात, बालाजीराव कोणत्याही कामाला नाही म्हणत नाहीत.या त्यांच्या स्वभावातील साधेपणा, समाजशील वृत्ती, लढवय्या बाणा,या वैशिष्ट्यांमुळे लोक त्यांना विधानसभेत दुसऱ्यांदा पाठवत आहे
त्यासोबतच या सरकारमधील एक यशस्वी आमदार म्हणून बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची असंख्य कामे खेचून आणली आहेत. कृषी महाविद्यालय, वाडी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालय, असदुल्लाबाद येथील इनामी जमिनीचा प्रश्न, रस्ते विकास, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे हद्दीतील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते विकास यासह अनेक महत्त्वपूर्ण कामे आमदार कल्याणकर यांच्या काळात झाली आहेत.
गेल्या ६५ वर्षातील विकासाचा अनुशेष अवघ्या अडीच वर्षात भरून कायाची किमया आ. कल्याणकर यांनी साधली असल्याने आगामी काळात महाराष्ट्रातील आदर्श विधानसभा मतदारसंघ म्हणून नांदेड उत्तरची वाटचाल कायम राहील असा भक्कम आशावाद शिवसेनेच ज्येष्ठ कार्येकर्ते मुन्ना राठौर यांनी व्यक्त केला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड