छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | विजय पाटील | एमजीएमनंतर(MGM Hospital Aurangabad) आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलवर ६५ वर्षीय महिलेवर चुकीचा औषधोपचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शनिवारी (२७ एप्रिल) रुग्णाच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन सिग्माला(Sigma Hospital) संशयाच्या कठड्यात उभे केले. रुग्ण महिलेचा मुलगा नंदकुमार पुरी, झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर पाटील, कार्याध्यक्ष नीलेश ढवळे, प्रदेश सचिव सचिन खरात, प्रदेश कार्याध्यक्ष अरुण नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की बोरी (जि. परभणी) येथील सखूबाई पुरी यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
त्यांना अन्य रुग्णाच्या रिपोर्टच्या आधारे औषधोपचार देण्यात आला. पुनर्तपासणीसाठी गेल्यानंतरही अन्य रुग्णाचा रिपोर्ट देऊन त्या आधारे औषधी लिहून दिली. रुग्णाने काही दिवस औषधी रुग्णाचा रिपोर्ट देऊन त्या आधारे औषधी लिहून दिली. रुग्णाने काही दिवस औषधी घेतली. मात्र त्रास होऊ लागल्याने जवळच्या एका रुग्णालयात दाखविले असता हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी आरोप फेटाळले आहेत. नातेवाइकांकडे चुकून दुसरे रिपोर्ट दिले गेले होते. मात्र रुग्णावर योग्य उपचार केलेला आहे. चुकीचा उपचार केलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर