तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !

सध्या संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीच्या विळख्यात सापडला असून सततच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तेथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिमायतनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष गजानन पांडुरंग ठाकरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात यावी. शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यात यावी. तात्काळ नवीन कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात यावे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांना शंभर टक्के पिक विमा वितरित करण्यात यावा. शेतकऱ्यांना रब्बी हंगामी मोफत बी- बियाणे व खते देण्यात यावे. ज्यांच्या ज्यांच्या घराची पडझड झाली त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. पावसामुळे ज्यांचे पशुधन वाहून गेली व मृत्युमुखी पडली त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना मुख्यालय राहण्याचे आदेश देण्यात यावे . ह्या मागण्या हिमायतनगर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हिमायतनगर चे तहसीलदार यांच्यामार्फत केली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यावेळी गजानन पांडुरंग ठाकरे तालुका अध्यक्ष मारुती दगडू शिंदे, संतोष गंगाधर टोकलवाड, कैलास नानाराव सूर्यवंशी, गजानन लक्ष्मण मिराशे, दशरथ साहेबराव मिराशे, प्रमोद मारोतराव पिंगळे, नारायण उमाजी लकडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.