👉🏻शिवसेनेचे मागणी…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील पंचायत समिती व तहसिल कार्यालयात अंतर्गत 1579 लाभ धरकाच्या घरांची सन 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक गोरगरीब नागरिकांच्या मातीच्या भीती व घरावरील टीन पत्रे वादळी वाऱ्यामध्ये उडून गेली होती तर काही जणांच्या भिंती पाण्याच्या पावसाने पडुन तालुक्यातील 52 ग्रामपंचायती मध्ये अनेकांचे नुकसान झाले होते त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले तेव्हा संबंधित गावच्या ग्रामसेवक व तलाठी यांनी ह्याचे पंचनामे करून सर्व अहवाल शासन दरबारी जमा करून सुद्धा अद्याप त्या नैसर्गिक आपत्तीचा निधी येथील तहसील व पंचायत समिती प्रशासनांकडून का वाटप करण्यात आला नाही ह्याचा जब जाब विचारण्यासाठी आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन हरडपकर, युवा सेना तालुका प्रमुख बाळा पतंगे,शामभाऊ येणेकर,प्रकाश हामपोलकर, बाळाजी करेवाड, धम्मपाल वाठोरे, सरपंच पवन करेवाड, शाम हुलकाने,गजानन गोपेवाड सह आदीनी येथील महसूल प्रशासनास धारेवर धरून येत्या पाच दिवसात हा निधी तात्काळ वाटप करून गोरं गरीब नागरिकांची दिवाळी साजरी करण्याची मागणी तहसीलदार यांच्या कडे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही महिन्यापूर्वी हिमायतनगर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी मध्ये शासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा निधी सुद्दा जमा झालेला आहे पण येथील महसूल व पंचायत समिती प्रशासनाच्या काम चुकार पणामुळे हा निधी शासनाकडे ताटकळत अडकला होता ? हा जाब विचारण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख गजानन हरडपकर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड साहेब यांना एक निवेदन देऊन मागणी केली असता तहसीलदार यांनी संबंधित पंचायत समिती व तहसील प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना बोलून हे काम तात्काळ मार्गी लावावे असे आदेश दिले त्यात सन 2022 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्यातील अनेक गोर गरीब नागरीकांचे संसार उघड्यावर पडले होते अनेक नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले होते त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या नागरिकांचा समुग्रह निधी तात्काळ देऊन त्यांना एन सणासुदीच्या काळात घरे बांधून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख गजानन हरडपकर सह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिमायतनगरचे तहसीलदार यांच्या कडे केली आहे