दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२०: बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात आतापर्यंत बौद्ध उमेदवाराला संधी देण्यात आली नाही. बहुसंख्येने बौध्द मतदार असलेला समाज सत्तेपासून वंचित राहिल्याने देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत आता तरुण तडफदार बौद्ध समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी या समाज बांधवांनी काँग्रेस पक्षाकडे केली असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. या अनुषंगाने पक्ष श्रेष्ठीकडे अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एका माजी आमदाराला उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा रंगत आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील एका पुढाऱ्याने आपली ताकद लावाल्याची चर्चा होती.
दरम्यान याच अनुषंगाने मुंबई येथे आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. देगलूर विधानसभा मतदारसंघातून तरुण तडफदार बौद्ध उमेदवारला संधी द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्षांनी अद्यापही देगलूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित झालेला नाही.
या अगोदर दोन वेळेस चर्मकार समाज, दोन वेळेस मातंग समाज बांधवांना उमेदवारी मिळाली मात्र प्रस्तापित पक्षाने अद्याप पर्यंत ही बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही तरी सुद्धा बौद्ध समाज बांधवांनी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान देवून प्रतिसाद दिला आहे. जर तरुण तडफदार बौद्ध समाजाच्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर त्याचे तीव्र पडसाद नायगाव विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असे मत प्रवाह स्वाभिमानी आंबेडकरवादी समाज बांधवांत व्यक्त होत असतांना दिसत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.