नांदेड दि.६ संष्टेबर : भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या वाढदिवसानिमित्त संध्या- छाया वृद्धाश्रमात क्षितिज जाधव व मित्रपरिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे पक्षनिष्ठ, निष्ठावान पदाधिकारी माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचा वाढदिवस संध्या- छाया वृद्धाश्रमात भाजपाचे माजी चिटणीस क्षितिज जाधव व मित्रपरिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. मागील वर्षी सुमन बाल गृहातील अनाथ मुलींना कपडे वाटप करण्यात आले. तर यावेळी संध्या छाया वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, सरचिटणीस विजय गंभीरे, शितल खंडिल, व्यंकटेश जिंदम, तुळजाराम बागडीया, गुरुदिपसिंग संधू, अनिलसिंह हजारी आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी उत्तम तिडके, विलास देवळे, प्रशांत धाकपडे, प्रफुल कांबळे, गौतम सारपाते, अजय सूर्यवंशी,मनोज चिंचोलीकर, धम्मा पंडित, पंकज खाडे, सुनील धुतमल,राजेश गायकवाड, विजय जाधव, विशाल दुधमल, संतोष गवळी, पवन जाधव, सुनील दुधमल, मारुती डाकोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दहिफळे यांनी केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!