

हिमायतनगर प्रतिनिधी/- भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांनी संपूर्ण मराठवाडा विभागात मागील काळात उत्कृष्ट काम करून भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत केले त्यामुळे विधानसभा क्षेत्रात संजयजी कोडगे यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल भाजपाला घवघवीत असे यश मिळाल्यामुळे दिनांक 22 एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नांदेड जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात आज भाजपा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून शहरातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला….

याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी मराठवाडा संघटनमंत्री प्रकाश कोडगे यांनी संपूर्ण मराठवाडा विभागात पक्ष संघटनेचे जाळे अधिक मजबूत करून अल्पावधीत नांदेड जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढविण्यासाठी संजयजी ने गेल्या काही महिन्यापासून ते काम करत आहेत मागील काळात भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानात नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यान कडून त्यांनी उत्कृष्ठ काम करून घेतल्यामुळे ते परिचित झाले त्यामुळे आज दिनांक 22 एप्रिल रोजी भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कोडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात शहरात विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 500 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून तेथील एकल पालकांचे पालकत्व स्वीकारून भाजपा पदाधिकाऱ्यांनी एक आगळा वेगळ्या पद्धतीने संघटन मंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला यावेळी तालुका अध्यक्ष गजानन चायल ,शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, रुपेश नाईक, पाकलवाड सर, प्रकाश सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, परमेश्वर नागेवाड, विशाल शिंदे, प्रशांत ढोले, सह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते