
हिमायतनगर प्रतिनिधी /- भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्र राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू आहे त्या मोहिमेची सुरुवात आज दि 30 डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यावेळी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरा सह तालुक्यात जास्तीत जास्त भाजपा कार्यकर्त्याची सदस्य नोंदणी करा असे आव्हान किशोर देशमुख यांनी केले आहे….

या बाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक बूथ प्रमुखांनी व संयोजकांनी शहरात 1 ते 10 जानेवारी दरम्यान भाजपाची नवीन सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करा आगामी होणाऱ्या निवडणुका या भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून सदस्य नोंदणीची ही मोहीम अधिक व्यापक करून जास्तीत जास्त नोंदणी करून एक विक्रम करायचा आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठे यश संपादन केले आहे महायुतीच्या सत्ता स्थापनेत भाजपा पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. हा विजय निरंतर ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्याला विजय मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने नवीन वर्षाच्या जानेवारी या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान पक्षाने हाती घेतले आहे. यासाठी तालुका मंडल आणि बूथ स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजक यांच्यासह सर्व आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी आपल्याला सोपवून दिलेल्या प्रभागांची जबाबदारी सांभाळून हे अभियान यशस्वी पार पाडायचे आहे असे अनमोल मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी केले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे मा.जिल्हाध्यक्ष डॉ.प्रसाद डोंगरगावकर ,तालुका अध्यक्ष गजानन चायल, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रुघेताई,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष किशोर रायेवार,उपाध्यक्ष बालाजी मंडलवार, लक्ष्मण ढाणके , रुपेश नाईक,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फिदायद खान,शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,लक्ष्मण डांगे,दुर्गेश मंडोजवार ,परमेश्वर नागेवाड, नितीन भुसावळे, सुधाकर चिठ्ठेवार,विशाल शिंदे,प्रकाश सेवनकर,गजानन पिंपळे,ज्ञानेश्वर कोरडे, पोशट्टी जाधव,परमेश्वर सातव,मारोती मोरे सह युवा मोर्चा,सोशल मीडिया सह सर्व भाजपा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट
हिमायतनगर शहरातील बाजारपेठेत फिरून केली सदस्य नोंदणी…

भारतीय जनता पार्टीने सदस्य नोंदणीची मोहीम अधिकच व्यापक करून आज दिनांक 30 डिसेंबर या वर्षाच्या सरते शेवटी हिमायतनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन भाजपा सदस्य नोंदणीची मोहीम शहरात सुरू केली आहे यावेळी नव मतदारांनाभाजपा परिवारामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले व भाजपाची सदस्य नोंदणीची मोहीम अधिक व्यापक प्रमाणात जिल्ह्यात सुरू असल्याचे भाजपा जिल्हाअध्यक्ष देशमुख यांनी सांगितले