नांदेड दि. २६ जून | छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा गोदमगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजरी करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि शिक्षण हक्काचे पुरस्कर्ते असलेल्या शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही कृती हाती घेण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, यांसारखे साहित्य वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत सर्वांना सामाजिक समतेच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजनक नॅशनल एससी एसटी, ओबीसी, स्टुडन्ट अँड टूथ फ्रंट नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शुभम विश्वनाथ दिग्रसकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खोबाजी डोंगरे, अशोक महाराज टाकळे, अशोक पंडित ,बाळू पाटील वडजे, विजय भद्रे, विलास भद्रे ,सुधाकर भद्रे ,बापुराव ढवळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शहाजी सुनपे ,सोनमकर सर, पुरुजवर सर ,देवणीकर सर, श्रीमती शिंदे, श्रीमती गुर्लेवाड, सदानंद इकडे आदींची उपस्थिती.
ADVERTISEMENT