हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरात नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीचा निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला या निवडणुकीमध्ये मातब्बरांच्या प्रतिष्ठा पनाला लागल्या होत्या शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी ताकद निर्माण केली होती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी ह्या प्रभागात जाहीर सभा घेऊन त्यांना पराभूत करण्यासाठी मोठे चक्रव्यू अखले होते या चक्रविव्हाला भेदत फेरोज खान यांनी काँग्रेसचा गड कायम राखत त्या ठिकाणी मोठे मताधिक्य मिळवत विजय मिळवला त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभागा सह सर्व शहरात सुपडा साफ करून या ठिकाणी मिळवलेल्या विजयाचे श्रेय फेरोज खान यांनी प्रभागातील मतदारांना दिले. (Himayatnagar News)
हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकी साठी दि 2 डिसेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया संपन्न झाली त्यानंतर शहरातील सर्वात चर्चेचा विषय बनलेल्या वार्ड क्र 14 मध्ये नगरसेवक होणार कोण ह्या वर अनेक राजकीय जानकारा कडून तर्क वितर्क लावत मोठा सट्टा लावण्यात आला होता कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुबशीरा फातेमा शेख सलिम व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मो. जावेद गंनी यांनी शहरातील वार्ड क्र 14 मध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या सभा घेऊन मतदारांना अनेक अश्वासने देऊन सुद्धा या प्रभागातील अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांच्या म. मुजतबा मतीन या उमेदवारस ते पराभूत करू शकले नाही उलट प्रभाग क्र 14 सह शहरातील सर्व जनतेने त्यांना नाकारल्या मुळे त्यांना ह्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे खाते सुद्धा उघडता आले नाही. (Himayatnagar Ward 14 Election Result)
त्यामुळे हिमायतनगर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकित दि 21 डिसेंबर मत मोजणीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या म. मुजतबा मतीन यांनी 330 असे मोठे मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास असमान दाखवत त्यांचा पराभव करत विजय मिळावीला या सर्व विजयाचे श्रेय प्रभागातील मतदारांना देत येणाऱ्या काळात प्रभागाच्या विकासा साठी सदैव तत्पर असलेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व विजयानंतर सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठी भेटी घेत धन्यवाद व्यक्त केले.













