दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि २४ जुलै : नुकत्याच सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी धर्माबाद न्यायालयातील अधिवक्ता संघ न्यायालयाच्या नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले असून धर्माबाद न्यायालयातील अधिवक्ता संघ न्यायालय धर्माबादचे अध्यक्ष म्हणून ॲड.राहुल सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे.
सह धर्मादाय आयुक्त श्रीमती हिरा शेळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री संजय यादव तसेच उप धर्मादाय आयुक्त श्रीमती ममता राखडे यांनी धर्माबाद न्यायालयातील अभिवक्ता संघ न्यायालय धर्माबाद ता. धर्माबाद जि.नांदेड च्या नोंदणीचे प्रमाणपत्र नांदेड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री आशिष गोधमगावकर, धर्माबाद न्यायालयातील अभिवक्ता संघ न्यायालय धर्माबादचे अध्यक्ष ॲड.श्री राहुल सोनटक्के यांना प्रदान केले असून सह धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड येथे आयोजित एका कार्यक्रमात सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड परीक्षेत्र, श्रीमती हिरा शेळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री संजय यादव तसेच उप धर्मादाय आयुक्त श्रीमती ममता राखडे यांनी धर्माबाद न्यायालयातील अभिवक्ता संघ न्यायालय धर्माबाद ता. धर्माबाद जि. नांदेड च्या नोंदणीचे प्रमाणपत्र नांदेड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आशिष गोधमगावकर, सचिव ॲड. अमोल वाघ तसेच धर्माबाद न्यायालयातील अभिवक्ता संघ न्यायालय धर्माबादचे अध्यक्ष ॲड.राहुल सोनटक्के यांना प्रदान केले. नूतन अध्यक्ष म्हणून निवडीनंतर ॲड.राहुल सोनटक्के यांना उपस्थित अधिवक्ता संघातील पदाधिकाऱ्यांनी सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!