ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.११जुलै : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्यक्रीडा विभाग यांच्यातर्फे मान्यता असलेले हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र ऑर्गनायझेशन यांच्या वतीने धर्माबाद येथील जिल्हा परिषद कन्या शाळा या मैदानावर कलर बेल्ट टेस्ट घेण्यात आली.
त्यात विविध पंचेस, किकक्स, ब्लॉक, वार्मप आणि कुमते तसेच काता ह्या सगळ्यांचा बारकाईने तपास करत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची कराटेच्या कसोटीवर तपासणी करत एकंदरीत पाच तास चाललेल्या या कलर बेल्ट टेस्ट मध्ये खालील प्रमाणे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवत ते कलर बेल्टचे मानकरी ठरले आहेत ज्यामध्ये येलो बेल्टसाठी शिवराज दिगंबरराव खपाटे, श्रद्धा साईनाथ हातनुरे,ईश्वरी श्रीनिवास मलपेल्लू तर ब्ल्यू बेल्ट साठी शरयू दत्तात्रय सीतावार, रागिनी काशिनाथ पांचाळ आणि सावली श्रीदास वाघमारे याविद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त डीवायएसपी श्री बोरसे साहेब व समाजसेवक आर्य शंकर जी सुरकुटवार यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमी धर्माबाद चे ग्रँडमास्टर श्री दत्तात्रय सीतावार व जिल्हा हाफ किडो चे अध्यक्ष चंद्रकांत आढाव यांचे मार्गदर्शन लाभले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांच्या मित्रपरिवार आणि व्यापारी वर्गाकडून कौतुक होत आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!