ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१२ जुलै : सन १९७२ पासून जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी संपूर्ण भारत देशामध्ये बजरंग दलाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविले जाते. त्याचप्रमाणे धर्माबाद येथील बजरंगदल प्रखंड धर्माबादच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम,गोसेवा, साफ स्वच्छता असे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद येथील डी.वाय.एस.पी प्रशांत संपते साहेब, पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर साहेब उपस्थित होते.
सध्या मोठ्या प्रमाणात जंगलात वणवे लागत असून त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर झाडे लावून बजरंग दलाच्या सर्व गोसेवकांनी एक पेड मा के नाम या प्रमाणे झाडे लावून आनंद व्यक्त केला.यावेळी पो.नि सदाशिव बडेकर साहेब म्हणाले की, जैवविविधतेचे संतुलन ही काळाची गरज असून, निसर्गाची किमया सर्वांनी समजून घेऊन स्वच्छ परिसर, हरित परिसर, सुंदर परिसर ही संकल्पना पूर्णत्वास न्यावी, जेणेकरुन स्वस्थ व निरोगी व्यक्ती-समाज-राष्ट्र निर्मितीसाठी मदत होईल.
वृक्षारोपण करण्यासाठी बजरंग दल धर्माबाद अध्यक्ष प्रशांत रापतवार, उपाध्यक्ष प्रविन मधनुरकर
तालुका मंत्री महादेव पाटील मंगनाळीकर,साईनाथ शिरपुरे,सचिनरेड्डी चाकरोड,सज्जन गड्डोड,साईनाथ पिल्ले,अमोल कदम, अविनाश पांचाळ, श्रीनिवास कोंडलवाडे, सचिन रत्नपारखे,लखन जयस्वाल,कैलास राजरवार,लालाजी इमनेलू, सिध्देश्वर मठपती महाराज,शिवाजी बोइनवाड,मोनिका यादव,रितिका सुर्वे,रितिका जल्लोड, पार्वतीताई जाधव,उषाताई बाचेवाढ,प्रशांतभाऊ,दिनेश एल्तेपोड नामदेव पांचाळ व सर्व बजरंग दल गोसेवक उपस्थित होते.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!